भारताचा प्रतिभावंत धावपटू मनजित सिंगने पुरुषांच्या ८०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली. ताे या गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने १ मिनिट ४६.१५ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली. यासह ताे या गटात चॅम्पियन ठरला. यादरम्यान त्याने अापल्याच देशाच्या सहकारी जाॅन्सनला मागे टाकले. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. याशिवाय त्याने एेतिहासिक कामगिरी केली. या गटात भारताने १९६२ नंतर पहिल्यादंाच हे यश संपादन केले. जाॅन्सनने अव्वल कामगिरी साधताना राैप्यपदकाची कमाई केली. त्याने १ मिनिट ४६.३५ सेकंदांत दुसरे स्थान गाठले.
ताई जू यिंगने सायना-सिंधूला सलग १६ वेळा हरवले
एशियाडमध्ये बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण जिंकण्याचे देशाचे स्वप्न भंगले. फायनल सामन्यात सिंधू तैवानच्या ताई जू यिंगकडून पराभूत झाली. रिअो ऑलिम्पिकपासून आतापर्यंत सिंधूचा हा १३ वा फायनल सामना होता. यात नवव्यांदा ती पराभूत झाली.
सिंधूची सुवर्णसंधी हुकली; एेतिहासिक राैप्यपदक
रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचे अाता एशियन गेम्समध्ये साेनेरी यश संपादन करण्याचे स्वप्न भंगले. तिची सुवर्णपदकाची संधी हुकली. यातून तिला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला मंगळवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जगातील नंबर वन ताईने फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला. तिने ३४ मिनिटांत २१-१३, २१-१६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह ती चॅम्पियन ठरली. यामुळे सिंधूला राैप्यपदक मिळाले. यादरम्यानची तिची विजयाची कामगिरी अपयशी ठरली.
या २३ वर्षीय सिंधूच्या कामगिरीतून भारतीय संघाला एेतिहासिक पदकाची नाेंद करता अाली. या गटातील भारताचे हे पहिलेच राैप्यपदक ठरले. यातून सिंधूने भारतीय संघाचा मागील चार दशकांतील पदकांचा दुष्काळही दूर केला. याच गटात माजी नंबर वन सायना नेहवालने कांस्यपदक पटकावले.
१९८२ नंतर भारताला एकेरीत पदक
भारतीय संघाला तब्बल ३६ वर्षांनंतर एकेरीच्या गटात पदकाची कमाई करता अाली. यापूर्वी भारताने पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले हाेते. मात्र, महिला एकेरीतील हे पहिलेच पदक अाहे. यापूर्वी कधीही महिला बॅडमिंटनपटूंना एकेरीत पदकाची कमाई करता अालेली नाही.
Post a Comment