- अजमेर- रेल्वे भरती बाेर्डाकडून येत्या १७ सप्टेंबरपासून घेतल्या जाणाऱ्या 'ग्रुप-डी' परीक्षेत उमेदवारांना ९० मिनिटांत १०० प्रश्न साेडवावे लागणार अाहेत. ही परीक्षा अाॅनलाइन घेण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे भरती बाेर्डाने परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला अाहे. या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका चार भागांत असेल. त्यातील पहिला भाग गणिताचा असेल व त्यात २५ प्रश्न विचारले जातील. दुसरा भाग सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा असून, त्यात ३० प्रश्न असतील. तिसऱ्या भागात सामान्य विज्ञानाचे २५ प्रश्न, तर चाैथा व शेवटचा भाग जनरल अवेअरनेस व चालू घडामाेडींचा असेल. त्यात २० प्रश्न विचारले जातील. तसेच सर्व प्रश्नांना समान गुण दिले जातील.
याबाबत बाेर्डाच्या चेअरपर्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडब्ल्यूडी उमेदवारांना प्रश्नपत्रिका साेडवण्यासाठी १२० मिनिटांची वेळ दिली जाईल. 'ग्रुप-डी' च्या सुमारे ६३,००० पदांसाठी ही अाॅनलाइन परीक्षा घेतली जाणार अाहे. ही परीक्षादेखील सुमारे १० टप्प्यांत पूर्ण केली जाईल व त्यात १.९० काेटी उमेदवार सहभागी हाेतील. दरम्यान, रेल्वे बाेर्डाकडून घेतली जाणारी ही अातापर्यंतची सर्वात माेठी परीक्षा असल्याचे सांगितले जात अाहे. रेल्वे बाेर्डाच्या इतिहासात यापूर्वी कधीही एवढ्या माेठ्या प्रमाणावर काेणत्याही विभागाची परीक्षा झालेली नाही. त्यासाठी देशभरातून काेट्यवधी उमेदवारांनी अर्ज केलेले अाहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment