- मुंबई- आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असलो तरी आमची लढाई कुणा व्यक्तीशी नाही. काँग्रेसची लढाई ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचाराधारेशी आहे आणि ही लढाई काँग्रेस प्राणपणाने लढेल, अशी भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. बुधवारी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
खर्गे राज्याचे प्रभारी झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘जे भाजप सरकारांच्या कारभारावर टीका करतात, त्यांना धमकावण्यात येत आहे. देशात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. मानवी हक्काचे सर्रास हनन होत असून निधर्मी विचार मांडणाऱ्या विचारवंतांचे अटकसत्र आरंभले असून देशात अघोषित आणीबाणी लागू केलेली आहे. संघाच्या कार्यक्रमाला राहुल यांना निमंत्रण आल्यास जातील का? या प्रश्नावर खर्गे म्हणाले, ‘चिठ्ठी तो आने दो...राहुल हे संघाच्या विषमतावादी विचारधारेशी लढत आहेत. संघ विचार म्हणजे विष आहे. विषाची चव कोण का घेईल? असा सवाल करत राहुल यांना मी संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला देईन’, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले. दहशतवाद, काळे धन आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाने मोदी यांनी नोटबंदी लागू केली. पण, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (२०१७-१८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात हजार, पाचशेच्या ९९.३० टक्के नोटा सरकारकडे जमा झाल्याचे म्हटले आहे. या अहवालाने मोदी सरकार उघडे पडल्याचा दावा खर्गे यांनी केला. मोदी हे केवळ जाहीर सभांमधून सरकारी कामाचे आकडे सांगतात. पण, मोदी यांना जरा संसदेतही भाई और बहनोंसाठी सांगावे, अशी अपेक्षा खर्गे यांनी व्यक्त केली.शरद पवारांना टोला
ज्या पक्षाचे खासदार अधिक येतील, त्या पक्षाचा पंतप्रधान असावा, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे खर्गे यांना विचारले असता ‘बकरी ईद मे बचेंगे तो रमजान में नाचेंगे’, असा टाेला त्यांनी पवारांना लगावला. तसेच नोटबंदी चुकीची असल्यास मला फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. तेव्हा अाता मोदी यांना तुम्ही विजयी चौकात की कुठे फाशी घेणार? अशी विचारणा अापण करू, असे खर्गे म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment