0
नवी दिल्‍ली - स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त भाजप अध्‍यक्ष अमित शहा यांनी पक्ष मुख्‍यालयात ध्‍वजारोहण केले. मात्र यादम्‍यान दोरी खेचताच, तिरंगा खाली आला. मात्र त्‍यांनी ताबडतोब झेंडा सांभाळला आणि नंतर ध्‍वजारोहण करत झेंड्याला सलामी दिली. या घटनेनंतर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने भाजपची खिल्‍ली उडवली आहे. काँग्रेसने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत म्‍हटले आहे की, जी व्‍यक्‍ती देशाचा झेंडा सांभाळू शकत नाही, ती देश काय सांभाळणार?' तर दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्‍हटले आहे की, 'तिरंग्‍याद्वारे भारत मातेला सांगायचे आहे की, ती दु:खी आहे.'

Post a Comment

 
Top