- मुंबई- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अाणखी एकाला बेळगाव जिल्ह्यातून येथून अटक करण्यात आली आहे. सागर लाखे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एसआयटीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप सागर लाखे याच्यावर ठेवण्यात आला आहे.
कर्नाटक एसआयटीने लाखे याला अज्ञात नेऊन त्याची कसून चौकशी सुरु आहे. पोलिस या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळत आहेत. सागर लाखे हा बेळगावमधील गणेशपूर भागात राहतो. कर्नाटक एसआयटीने बेळगावच्या कॅम्प पोलिस स्टेशनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली.दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखे याचे नाव समोर येत होते. त्यामुळे सागरचा शोध घेत बुधवारी मध्यरात्री एसआयटीने त्याला अटक केली.गौरी लंकेश आणि डॉ.दाभोलकर यांच्या हत्येत एकाच दुचाकीचा वापरगौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी मंगळवारी महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली होती. तसेच अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा मास्टर माईंड होता, अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी 28 ऑगस्टला दिली होती.दुसरीकडे, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला आज दुपारी पुणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment