0
कोलकता: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांना हॉर्टअटॅक आल्यामुळे स्थिती गंभीर झाली होती. सोमवारी सकाळी त्यांनी शेवटला श्वास सोडला.२००४ ते २००९ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. २००८ मध्ये सोमनाथ चॅटर्जी यांनी पक्षादेश मानण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. सीपीएमने त्यावेळी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.

सोमनाथ चॅटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते

Post a Comment

 
Top