0
श्रीनगर - दहशतवाद्यांनी बुधवारपासून गुरुवारी रात्रीदरम्यान काश्मीरच्या विविध भागांमधून पोलिस कर्मचाऱ्यांच्या 9 नातेवाईकांचे अपहरण केले. या सर्वांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आले असे सांगण्यात येत आहे. सुरक्षा संस्थांना याचा संबंध हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सय्यद सलाहुदीनचा मुलगा सय्यद शकील अहमदच्या अटकेशी असल्याचा संशय आहे.


दहशतवादी आतापर्यंत काश्मीरमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले करत होते. पण आता त्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. 24 तासांत एकाचवेळी नऊ नातेवाईकांचे अशाप्रकारे अपहरण करण्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी त्रालमधून एका पोलिसाच्या मुलाला आणि गंदेरबलमधून एका जवानाच्या कुटुंबातील सदस्याचे अपहरण केले होते. गंदेरबलमधून अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीला दहशतवाद्यांनी बेदम मारहाण करत सोडून दिले. त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांच्या इतर सात नातेवाईकांचे शोपियां, कुलगाम, अनंतनाग, त्राल आणि अवंतिपोरामधून अपहरण करण्यात आले. त्यात पोलिस अपाधिक्षकांच्या भावाचाही समावेश आहे. यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये दहशतवाद्यांनी बांदीपोरामध्ये एका पोलिस कॉन्सटेबलच्या भावाचे अपहरण केले होते.

यांचे करण्यात आले अपहरण 
झुबेर अहमद बट, आरीफ अहमद
शंकर, फैजान अहमद मकरू, समर अहमद राठेर, गोहर अहमद मलिक, यासीर अहमद बट, नासीर अहमद, शब्बीर अहमद जरगर, आसीफ अहमद राठेर.

सलाहुद्दीनच्या मुलाकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त 
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने टेरर फंडिंग प्रकरणात गुरुवारी सय्यद शकील अहमदला श्रीनगरच्या रामबाग परिसरातून अटक केले. याठिकाणाहून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. एनआयएने सलाउद्दीनचा मोठा मुलगा सय्यद शाहीदला टेरर फंडींग प्रकरणीच गेल्या वर्षी अटक केली होती. तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहे. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने आतापर्यंत सहा जणांच्या विरोधात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यात हुर्रियत कॉन्फरस प्रमुख सय्यद अली शाह गिलानींचे नीकटवर्तीय जीएम भट, मोहम्मद सिद्दीक गनी, गुलाम जिलानी आणि फारूक अहमद यांचा समावेश आहे.
terrorists kidnapped 9 relatives of Police from Kashmir last Night

Post a Comment

 
Top