0
मुंबई - भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन झाल्‍याची धक्‍कादायक बातमी आहे. मुंबईत त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. त्‍यांच्‍या निधनाने क्रिकेट चाहत्यांना धक्‍का बसला आहे. क्रिकेटमधील एक महत्‍त्‍वाचा तारा निखळल्‍याची भावना यानिमित्‍ताने व्‍यक्‍त केली जात आहे.
अजित वाडेकर यांचा अल्‍प परिचय
अजित लक्ष्‍मण वाडेकर यांचा 1 एप्रिल, 1941 रोजी मुंबर्इत जन्‍म झाला. आक्रमक फलंदाज अशी त्‍यांची ओळख होती. 1966 ते 1974 दरम्‍यानची त्‍यांची आंतरराष्‍ट्रीय कारकिर्द आहे. त्‍यांनी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. भारताला कसोटी मालिका जिंकून देणारे ते पहिले कर्णधार होते. तसेच भारताच्‍या वनडे टीमचे ते पहिले कर्णधार होते. खेळातील उत्‍कृष्‍ट योगदानाबद्दल 1967 साली त्‍यांना अर्जुन पुरस्‍कर तर 1972 साली पद्मश्री 

Post a Comment

 
Top