पुणे- कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलप्रकरणाशी संबंधित तपासात पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरातील अनेक शहरांत छापे मारले. एल्गार परिषदेला आर्थिक रसद व शहरी नक्षलवाद्यांचे थिंक टँक असल्याचा आरोपावरून डाव्या विचारांच्या पाच जणांना अटक केली आहे.
हैदराबादेतून विद्रोही कवी आणि माओवादी विचारवंत वरवर राव, हरियाणाच्या फरिदाबादेतून सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, दिल्लीतून नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा, ठाण्यातून अरुण परेरा, मुंबईतून व्हेरनॉन गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली आहे. वरवरा राव, वर्णन गोंसलविस, अरुण परेरा यांना बुधवारी दुपारी दोन वाजता कोर्टात हजर करणार आहे. सुधा भारद्वाज आणि गौतम नावलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला विरोध केल्याने सुनावणी झाल्यावर पुढील निर्णय स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोदी, शहांच्या हत्येचा कट
गेल्या काही महिन्यांत मिळालेल्या दोन चिठ्ठ्यांत माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एका चिठ्ठीत लिहिले होते, ‘मोदी हिंदुत्ववादी नेते आहेत. 15 राज्यांत त्यांची सरकारे आहेत. यामुळे इतर पक्षांच्या अडचणी वाढतील. मोदींना संपवावे लागेल. राजीव गांधी हत्येसारखी घटना पुन्हा घडवावी लागेल. रोड शोत मोदींना टिपता येईल. एम- 4 रायफल व गोळ्या खरेदीसाठी 8 कोटींची गरज आहे.’

दरम्यान, मंगळवारी तपास पथकाने झारखंडच्या रांची येथील फादर स्टॅन स्वामी यांच्या घराची झडती घेत चौकशी केली. गोव्यातील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील वरिष्ठ प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या घरी छापा मारण्यासाठी एक पथक गेले होते. मात्र, तेलतुंबडे मुंबर्इला असल्याने कारवाई करण्यात आली नाही. शहरी नक्षलवाद चळवळ सक्रियपणे चालवणे व तसेच नक्षली विचारधारेचा प्रसार करण्यात या व्यक्तींची महत्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
संशयित आरोपींवर पोलिसांनी भादंवि संहिता कलम 153 (अ), 505 (1) (ब), 117, 120 (ब), बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा 1967 चे सुधारित अधिनियम 2012 चे कलम 13,16,18,18 (ब), 20, 38, 39, 40 यूएपीए अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नक्षलवादी चळवळीचे सूत्रसंचालन करण्यासोबतच चळवळ टिकवून ठेवून तिचा विस्तार करण्याचे काम संबंधित व्यक्ती करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सीपीआय (एम) या बंदी असलेल्या माओेवादी संघटनेच्या नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहून शहरी भागात संघटन, प्रचार-प्रसार, कार्यकर्त्यांची भरती आणि जडणघडण यामध्ये प्रामुख्याने या व्यक्ती भूमिका बजावत आहेत. ते माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत. समाजात अस्थिरता निर्माण करणे व सरकार उलथवून अराजकता माजवणे, घटनेविरोधात काम करणे आदी माध्यमातून ते कार्यरत असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
अटकेला समर्थकांकडून विरोध
आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथून विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यानंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर जमवाजमव करत कारवार्इला विरोध केला. राव यांना पोलिसांनी स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यांची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासोबत इतर आरोपींनाही न्यायालयात हजर केले जाईल.
यापूर्वी नक्षल समर्थक पाच जणांना अटक
कोरेगाव-भीमा विजयस्तंभास 200 वर्षे पूणे झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवार वाड्यात 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे दोन गटात दंगल उसळून हिंसाचार झाला होता. याप्रकरणी तुषार दामगुडे या तरुणाने एल्गार परिषदेत नक्षलवादी धागेदोरे असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार, 18 एप्रिल रोजी पोलिसांनी कबीर कला मंचाशी संबंधित व्यक्तींच्या घरे व कार्यालयांवर छापे टाकले होते. जप्त कागदपत्रांच्या अनुषंगाने तपासात एल्गार परिषदेच्या आयोनातील सुधीर ढवळे यांचे माओेवादी कॉमरेड मंगलू आणि दीपू यांच्याशी परिषदेच्या दोन महिने आधीपासून संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, 6 जूनला पोलिसांनी दिल्लीतून रोना विल्सन, नागपुरातून अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, प्रा.शोमा सेन, मुंबईतून सुधीर ढवळे यांना अटक केली होती.

अटक केलेल्या व्यक्तींमध्ये वकील, लेखक व कार्यकर्ते
स्टॅन स्वामी:
स्टॅन स्वामी:
झारखंडमधील रांची परिसरात आदिवासी लोकांच्या भूमी अधिकार विषयाशी निगडित ‘पत्थलगडी’ आंदोलनात सक्रिय सहभाग. या आंदोलनादरम्यान काही लोकांना चिथावणी केल्याचा आरोप. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ओळख. विकासकामांच्या विरोधात अनेक वेळ भूमिका मांडली.
व्हेरनॉन गोन्सालवीस आणि अरुण परेरा:
मुंबर्इतील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित. अरुण परेरा यांच्यासोबत काम. अरुण परेरा यांना 2007 मध्ये माओेवादी म्हणून अटक झाली होती, नंतर पाच वर्षांनी पुराव्याअभावी मुक्तता. डाव्या विचारसरणीशी बांधिलकी, बेकायदा गोष्टींविरोधात भूमिका मांडत.
गौतम नवलाखा:
दिल्लीतील रहिवासी. नवलाखा मानवाधिकार कार्यकर्ते. पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्स संघटनेच्या माध्यमातून काम. डेज अँड नाइट्स इन द हार्टलँड फॉर रिबेलियन या पुस्तकाचे लेखक. जम्मू-काश्मीरमधील लोकांचे मानवाधिकार अबाधित राहावेत याकरिता सातत्याने काम. 2010 मध्ये त्यांना काश्मीरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. छत्तीसगडमधील माओेवादी प्रभावित क्षेत्रातही काम.

Post a Comment