नागपूर- गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युग मेश्राम असे बळी देण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुनील बनकर आणि प्रमोद बनकर या दोन्ही मांत्रिकांना अटक केली आहे. युगच्या केसात तीन भोवरे असल्याचे गुप्तधनासाठी त्याचा बळी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
युग मेश्राम हा 22 ऑगस्ट रोजी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. युगचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली होती. मात्र, युग मेश्रामचा मृतदेह घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात 29 ऑगस्टला आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. अखेर युग मेश्रामाचा नरबळी दिल्याच सुनील आणि प्रमोद बनकर या दोघांच्या चौकशीतून स्पष्ट झाले.
युगची पूजा करून केली हत्या..
युग घराबाहेर खेळत होता. त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे आरोपींनी अपहरण केले. नंतर गुप्तधनाच्या लालसेपोटी युगची पूजा करुन त्याची हत्या केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.

औरंगाबादेत अंनिस आणि पोलिसांनी उधळला नरबळीचा डाव
फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे गुप्तधन काढण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. गावातील पडलेल्या घरात दडलेले गुप्तधन शेतातील घरातून काढून देतो. मात्र, त्यासाठी मुलीची नग्न पूजा करून तिचा बळी द्यावा लागेल, असे सांगणार्या दोन भोंदू मांत्रिकांचा डाव अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी उधळून लावला होता.
दरम्यान, गुप्तधन काढण्यासाठी त्यांना मुलीचा नरबळी द्यायचा नव्हता, तर केवळ जाधव परिवाराकडून आणखी जास्तीचे पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचे तपासात उघड झाले. अटकेतील आरोपी बाळू गणपत शिंदे व इमामखॉ हसन पठाण या दोन्ही भोंदू मांत्रिकांना त्यांच्याकडून अगोदरच जास्त पैसे मिळाल्याने त्यांचे आणखी पैसे उकळण्याचे नियोजन होते.
काय आहे हे प्रकरण?
रांजणगाव येथे आरोपी दिगंबर कडुबा जाधव यांच्या शेतात एका मुलीची नग्नावस्थेत पूजा करून तिचा नरबळी देण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ‘अंनिस’ व प्रसार माध्यमांच्या समक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता रांजणगाव शिवारातील शेत वस्तीवरील घरात गुप्तधन काढण्यासाठी मांडलेली पूजा दिसून आली, तर बाळू शिंदे हा या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसलेला होता. दोन दिवस अगोदर सदर मांत्रिकांनी जमिनीत अगोदरच दडवून ठेवलेली दीड किलो वजनाची एक पितळी मूर्ती काढून दाखवली होती. या मूर्तीच्या खाली धन असून ते काढण्यासाठी त्यांच्यात 1 लाख 68 हजार रुपयांची तडजोड झाली होती. त्यानुसार त्यांनी एक तांब्याचा हंडा काढून दाखवत त्यामध्ये सोने असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. वास्तविक पाहता हंड्यात राख व माती निघाली. दोन्ही भोंदू मांत्रिकांना त्यांच्याकडून आणखी पैसे उकळायचे असल्याने त्यांनी जमिनीत आणखी एका हंड्यात गुप्तधन असून ते काढण्यासाठी व अगोदर काढलेल्या धनाची शांती करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री एका मुलीची नग्नावस्थेत पूजा करावी लागेल व तिचा बळी द्यावा लागेल, असे जाधव यांना सांगितले होते.

Post a Comment