0
येडशी- पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये १० जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पुणे-लातूर राज्य मार्गावर येडशीपासून दोन किमीवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाला. अपघातापूर्वी येडशीमध्ये ट्रॅव्हल्सचा चालक बदलला होता. त्यानंतर १० मिनिटांतच हा अपघात झाला.


मुंबईहून लातूरकडे प्लास्टिक घेऊन निघालेला ट्रक इंधन संपल्यामुळे येडशीजवळ रस्त्याच्या कडेला उभा केला होता. पुण्याहून लातूरकडे निघालेल्या खासगी बसने (एमएच २४ एबी ५५८८) या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात खासगी बसमधील चालकासह २२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये सुलताना सलीम शेख ( रा. हडपसर) नादानदी सय्यद ( निगडी पुणे), दिनेश ढावारे ( रा. तेर), पंढरी अदमाने ( अंबाजोगाई), कमलाबाई अदमाने, लक्ष्मीबाई कुंभार (लातूर), लक्ष्मीबाई कांबळे (उदगीर) सुलताना शेख (पुणे), अजीज शेख (रेणापूर), विष्णू फताणे (लातूर), किशोर भोसले (लातूर), सगद अमनवार (घनसरगाव), अंबादास क्षीरसागर(लातूर), अंबादास वाघमारे (आष्टा कासार), रतन शिंदे, दीपक राऊत, गोपाळ भागवत नारखेडे (सदाशिव पेठ, पुणे), युवराज वडवे (उजनी), मोहिज पटेल(अौसा), भगवान फावडे (हिपळनेर, ता. चाकूर), रंजना वाघमारे यांचा समावेश आहे. यापैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर गिरी व हेड कॉन्स्टेबल जाधव हे तत्काळ अपघातस्थळी पोहोचले. बसच्या काचा टामीने फोडून प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Major Accident In Osmanbad Of Truck And Travels Bus, 22 Injuered

Post a Comment

 
Top