0
arjun kapoor trolls katrina kaif on her latest hot photoshoot video | OMG!! कॅटरिना कैफचा ‘मलंग’ व्हिडिओ पाहून हे काय बोलून गेला अर्जुन कपूर?बुधवारी कॅटरिना कैफने आपल्या ‘मलंग’ फोटोशूटची एक झलक दाखवणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅट लगेच चर्चेत आली. या व्हिडिओला कॅटने ‘पाऊडर अ‍ॅण्ड अर्थ’ असे गर्भित   कॅप्शन दिले. कॅटचा व्हिडिओतील हॉट अंदाज लोकांना चांगलाच भावला. अनेक जण  कॅटचा बोल्ड अ‍ॅण्ड हॉट अंदाज पाहून खल्लास झालेत. पण बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींना मात्र कॅटचा हा अंदाज कदाचित फार भावला नाही. होय, विशेषत: अर्जुन कपूर. कॅटरिनाचा हा व्हिडिओ पाहून अर्जुनने एक भलतीच कमेंट केली. त्याच्या त्या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले. अर्जुनने अशी कमेंट का द्यावी, हा प्रश्नही अनेकांना पडला. हा कॅटरिनाला ट्रोल करण्याचा तर प्रयत्न नाही ना, इथपर्यंत लोकांना शंका आली. आता अर्जुनने अशी काय प्रतिक्रिया दिली, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर कॅटचा हा व्हिडिओ पाहून, ‘तुम्हे डेंड्रफ हो गया क्या कॅटरिना,’ असे अर्जुनने लिहिले. अर्थात अर्जुनची ही कमेंट कॅटरिना फार मनावर घेणाऱ्यांपैकी नाही. कारण शेवटी कॅट व अर्जुन हे दोघेही चांगले मित्र आहेत आणि मैत्रीत इतके चालतेच.
असो, अर्जुनला हा व्हिडिओ आवडो ना आवडो. पण कझिन सोनम कपूर आणि करण जोहर या दोघांना मात्र तो खूप आवडला. व्हेरी हॉट, असे करणने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले तर सोनमने, इंप्रेसिव्ह...अशा शब्दांत कॅटच्या या व्हिडिओची प्रशंसा केली.
काल कॅटने या फोटोशूटचे काही फोटो ‘मलंग’ या नावाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. तिने यात दिलेल्या अनेक पोज तिच्या ‘धूम3’ या चित्रपटातील ‘मलंग’ गाण्याची आठवण करून देणा-या आहेत.
लवकरच कॅटचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. याशिवाय शाहरूख स्टारर ‘झिरो’मध्येही ती दिसणार आहे.

Post a Comment

 
Top