
भारतीय संघातील दोन प्रमुख खेळाडू इंग्लिश गाण्यावर हटके डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या आणि शिखर धवन हे दोन खेळाडू इंग्लिश गाण्यावर थिरकले. पांड्याने आपल्या ट्विटर हॅण्डलवर या नृत्याचा व्हिडिओ शेअर केला आणि बघताबघता तो व्हायरल झाला. पाहा कसा आहे, पांड्या व धवनचा डान्स...दरम्यान, गेल्या दोनदिवसांपूर्वी झालेले आयर्लंडविरूध्दचे दोन सामने भारताने सहज जिंकले. भारताने पहिल्या लढतीत ७६, तर दुसऱ्या लढतीत १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी -२० सामन्यांच्या मालिकेला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Post a Comment