0
मुंबई : आरोग्याविषयी कार्यरत असलेल्या दादरच्या एका कंपनीच्या कार्यकारी संचालकाने, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करायची १ कोटी ९४ लाख ४९ हजारांची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी झिकीटझा हेल्थ केअर कंपनीचा तत्कालीन संचालक नरेश धनराज जैन (रा. लोखंडवाला कॉम्प्लेक्स रोड, अंधेरी) याच्याविरुद्ध एन. एन. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत हा गैरव्यवहार करण्यात आला असून, कर्मचारी प्रकाश नाईक यांनी त्याबाबत तक्रार दिली आहे.
दादरमधील सेनापती बापट मार्गावरील सनशाइन टॉवरच्या २३व्या मजल्यावर झिकीटझा हेल्थ केअर कंपनीचे कार्यालय होते. कार्यकारी संचालक नरेश जैन यांनी २०१७ या वर्षातील जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीतील, कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीसाठी जमा करायची एकूण १ कोटी ९४ लाख ४९ हजार एवढी रक्कम, पीएफ कार्यालयात जमा न करता परस्पर त्याचा अपहार केला. याबाबतची तक्रार प्रकाश नाईक यांनी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
Drawn on the amount of PF 2 crores | पीएफच्या दोन कोटींच्या रकमेवर डल्ला

Post a Comment

 
Top