0
मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' ला मिळालेल्या यशानंतर आता संजय दत्त आणि रणबीर कपूर एकत्र एका स्क्रीनवर काम करताना दिसण्याची शक्यता आहे. संजू सिनेमानंतर आता प्रेक्षकांना रिअल लाइफ संजय दत्त आणि रिल लाइफ संजय दत्त यांना एकत्र बघण्याची उत्सुकता लागली आहे. याच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 
मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्त आणि रणबीर कपूर एका सिनेमात एकत्र काम करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही राजकुमार हिरानींच्या आणखी एका सिनेमात एकत्र दिसू शकतात. हा सिनेमा 'मुन्ना भाई' सिक्वल असेल, राजकुमार हिरानी यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती एका वेबसाईटला दिली. 
सूत्रांनी सांगितले की, हिरानी या सिनेमात सर्किटच्या भूमिकेत रणबीरला साइन करणार आहेत. याआधीच्या दोन्ही सिनेमात सर्किटच्या भूमिकेत अभिनेता अर्शद वारसी दिसला होता. पण याबाबत काहीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. पण संजूमध्ये रणबीरने केलेली संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. दोघांची केमिस्ट्रीही चांगली आहे. अशात दोघे एकत्र दिसले तर प्रेक्षकांना मेजवानीच मिळण्याची शक्यता आहे. 
Ranbir Kapoor may play circuit character in the munna bhai sequel | संजय दत्तनंतर आता रणबीर दिसणार सर्किटच्या भूमिकेत?

Post a Comment

 
Top