0
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मुलं दत्तक घेतले आहे. हॉलिवूडमध्येही अशा अनेक नट्या आहेत. ज्यांचे स्वत:चे मुलं नाही, पण त्यांनी मुलं दत्तक घेतले आहे, अशा अनेकजणी आहेत. तशात स्वत:चे अपत्य असूनही मुलं दत्तक घेणाऱ्याही ब-याच आहेत. आता या यादीत हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहान हिचे नावही समाविष्ट होणार आहे. होय, लिंडसेला एक मुलं दत्तक घ्यायचे आहे. मला लवकरात लवकर एक मुलं हवेयं. मला या मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवायचाय. मी यासंदर्भात माझ्या कुटुंबाशीही बोललेय, असे लिंडसेने एका ताज्या मुलाखतीत सांगितले. आता प्रश्न उरतो की, अचानक मुलं दत्तक घेण्याची इच्छा लिंडसेला का व्हावी? तर यामागेही कारण आहे. तिनेच याचे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी मी तुर्कस्थानच्या दौ-यावर गेले होते. याठिकाणी मी सीरियाच्या शिबीरार्थींसोबत बराच वेळ घालवला. त्या दौ-यात माझ्या मनात मुलाची अनावर इच्छा निर्माण झाली. माझेही मुलं हवे, असे मला वाटू लागले. पण पहिले बाळ जन्मास घालण्याऐवजी मी ते दत्तक घेणार आहे, असे तिने सांगितले.
मला मुलं खूप आवडतात. मला एक नाही तर दोन-चार मुलं हवी आहे. तूर्तास मी लग्न वगैरे करणार नाही. पण होय, एक मुलं दत्तक घेईल, असेही तिने स्पष्ट केले.
तुम्हाला माहित असेलचं की, लिंडसे अद्याप सिंगल आहे. २०१६ मध्ये रशियाचा अब्जाधीश इगौर ताराबसोव्हसोबतचा साखरपुडा तिने तोडला होता.

lindsay lohan want to adopt baby | लिंडसे लोहानला लवकरात लवकर हवे स्वत:चे मुलं!

Post a Comment

 
Top