नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव स्वीकारला आहे.
देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत लोकसभेत टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे आता मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे.

Post a Comment