0
नवी दिल्ली- राहुल गांधी यांनी राफेल खरेदीबाबत थेट आरोप केल्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणानंतर आपली बाजू मांडली. निर्मला सीतारामन यांनी फ्रान्सबरोबर भारताचा करार झाला असल्याने राफेल विमानाची किंमत देशाला सांगता येणार नाही असे खोटे वक्तव्य केल्याचा आरोप राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केला. 
भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये गुप्ततेचा करार 25 जानेवारी 2008 साली काँग्रेसचे मंत्री ए. के. अँटनी यांनीच केला होता. असे सांगत निर्मला सीतारामन यांनी फ्रान्सबरोबर झालेल्या कराराची प्रत दाखवत ए. के. अँटनी यांची स्वाक्षरीही दाखविली. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एका भारतीय माध्यमाला मुलाखत देताना कराराची माहिती देता येणार नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. राहुल गांधी यांनी असत्य विधान करत आपल्यावर आरोप केला असेही सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले. 
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राफेल विमानाच्या खरेदीमध्येही घोटाळा झाला असून, मोदी सरकारच्या काळात अचानक प्रत्येक विमानाची रक्कम 500 कोटीवरुन 1600 कोटी रुपये झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या विमानाची किंमत सांगण्यास नकार दिला. फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये  झालेल्या करारामुळे माहिती देता येत नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटून याबाबत माहिती विचारली असता असा कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निर्मला सीतारामन खोटे बोलल्या आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांवर केला. यावर संरक्षण मंत्री सीतारामन आणि भाजपाच्या खासदारांनी विरोध केला आणि आक्षेप घेतला.
राफेल घोटाळ्यातून एका विशिष्ट उद्योजकाला हजारो कोटींचा फायदा झाला, असा थेट आरोपही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशिष्ट उद्योजकाला का मदत केली हे स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी दिले. राहुल गांधी यांच्या या आरोपामुळे सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण तयार झाले. पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत हे सगळ्या देशाने पाहिले आहे.
No Confidence Motion: The contract took place in Congress itself, Sitaraman gave a reply to Rahul Gandhi | No Confidence Motion: करार काँग्रेसच्याच काळात झाला, सीतारामन यांनी दिले राहुल गांधींना प्रत्युत्तर

Post a Comment

 
Top