0
श्रीनगर :  जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढताहेत. सोमवारी (16 जुलै) सकाळीदेखील कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीदरम्यान जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. तसंच घटनास्थळावरुन जवानांनी एक 47 रायफल ताब्यात घेतली आहे.  यादरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. 
यापूर्वी, 9 जुलैला जम्मू काश्मीरमधील कुपवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. कुपवाड्यातील हंडवाडा येथे रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. हंडवाड्यात दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्याने गोळीबार केला, त्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले. यामध्ये हा दहशतवादी मारला गेला. 
तर 11 जुलैला कुपवाडा जिल्ह्यातील कांडी जंगल क्षेत्रात करण्यात आलेल्या एन्काऊंटरमध्ये शिपाई मुकुल मीना यांना गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी घटनास्थळावरुन त्यांना सुखरुपरित्या बाहेर आणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
13 जुलैलाही जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गस्तीवर असलेल्या जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले होते. 
A terrorist has been killed while as two army men injured in an encounter in kupwara | Jammu Kashmir : कुपवाड्यात जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा

Post a Comment

 
Top