
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्यानं तिला पालकांनी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी समुपदेशकांनी पीडितेशी संवाद साधला. आई-बाबा घरी नसताना मोठ्या भावानं आपल्यावर जबरदस्ती केल्याचं पीडितेनं समुपदेशकांना सांगितलं. पीडित मुलगी आठ वर्षांची असून तिचा भाऊदेखील अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पीडितेची भेट घेतली.
'पीडित मुलीला गंभीर इजा झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे,' अशी माहिती मालीवाल यांनी दिली. 'पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे महिला आयोगाकडून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून याबद्दल सरकारनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मालीवाल यांनी म्हटलं.
Post a Comment