0
शेलुबाजार : शेलुबाजार येथील स्थानिक चौकातील मंगरूळपीर रोडवरील खडामय रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले आहे. सामजिक कार्यकर्ता अर्जुन भीमराव सुर्वे यांच्यासह नागरिकांनी 18 जुलै रोजी नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावर रास्तारोको केला. राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंजिलवार यांनी रस्त्यावर पडलेले खड्याची दुरुस्ती करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांना व शाळकरी मुलांना या मार्गावरुन मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत होती . १२ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भिमराव सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे  येत्या १७ जुलैपर्यत खड्डे दुरूस्त न केल्यास  १८ जुलै रोजी रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता.  सुरुवातीला संबंधित विभागाकडून या रस्त्यावर मातीयुक्त मुरूम टाकल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामूळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. १७ जुलै पर्यंत संबंधित विभागाने खड्डे बुजण्याचे काम पूर्ण न केल्याने  नागपुर औरंगाबाद द्रुतगती मार्गावर रास्तारोको करण्यात आला. 
शेलुबाजार चौकातील मंगरूळपीर रोडवर पाणी वाहून नेण्यासाठी नाला नसल्यामूळे पडलेल्या खड्यामध्ये पाणी साचते. त्यामूळे लोकांना खड्याचा अंदाज येत नाही. रास्तारोको दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंजिलवार हे घटनास्थळी पोहचले. साईप्रसाद यांनी आंदोलकांची मागणी मान्य करून रस्ता लवकरच व्यवस्थित करून देऊ असे आश्वासन दिल्यामूळे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
'Rastaroko' for the road at Selubazar | शेलुबाजार येथे रस्त्यासाठी ‘रास्तारोको’

Post a Comment

 
Top