पनवेल - हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाचा जवान आणि प्रवाशांनी मिळून एका माणसाचा जीव वाचवला आहे. पनवेल स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेमध्ये चढताना हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. यावेळी तो एक्स्प्रेसखाली येण्याचीदेखील शक्यता होती. मात्र रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचा सतर्क जवानानं त्याला वेळीच मागे खेचले आणि त्याचे प्राण वाचवले. 14 जुलैला ही घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विनोद शिंदे हे प्रवासी रवी बाळूसाठी देवदूत ठरले आहेत.
शनिवारी (14 जुलै) संध्याकाळी पनवेल स्थानकात पनवेल-नांदेड एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात रवी बाळूचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीमध्ये सापडण्याची यावेळी भीती होती. यावेळी स्वतःच्या जिवाची काळजी न करता विनोद शिंदे यांनी रवी बाळूला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि एक्स्प्रेसखाली येण्यापासून त्याचा बचाव केला.

Post a Comment