0
नागपूर : नागपूरमध्ये विधान भवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका तरुणाने अशाप्रकारचे कृत्य केले आहे. विधान भवनासमोर आशिष आमदरे या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, एका टँकर चालकाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करुनही कारवाई करण्यात आली नाही. तसेच, यासंबंधीची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा करण्यात आली आहे. तरी सुद्धा यावर कारवाई करण्यात आली नाही. या निषेधार्थ आशिष आमदरे याने विधानभवनासमोर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आशिष आमदरे याला पोलिसांनी रोखले आणि ताब्यात घेतले आहे. 
दरम्यान, काल विधानभवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. महापालिकेने पुन्हा सेवेत घ्यावे, अशी त्याची मागणी करत प्रकाश बर्डे या कर्मचाऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न होता. 
front of the Vidhan Bhavan in Nagpur youths attempt suicide | नागपुरात विधान भवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

Post a Comment

 
Top