0
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे खड्डा चुकवताना प्रमोद मालखेडे (वय 32 वर्ष)  व विनोद मालखेडे (वय 32 वर्ष) या भावंडांचा बाईक अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघंही बाईकनं राजुराहून वरुर रोडच्या दिशेनं प्रवास करत असताना तुलाना गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी रात्री 8 वाजताची ही घटना आहे.  दरम्यान, राजुरा- लक्कडकोट या मार्गावरील खड्ड्यांमुळे या दोघांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.  Chandrapur : 2 dead in bike accident | खड्डा चुकवताना बाईक अपघातात भावंडांचा मृत्यू

Post a Comment

 
Top