0
पुणे : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टीलच्या पट्टीला जाऊन धडकल्याने स्टीलची पट्टी कारच्या अारपार गेली. या भीषण अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकजण किरकाेळ जखमी झाला अाहे. मंगळवारी पहाटे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर साेमाटणे फाटा पुलाजवळ हा अपघात झाला. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत अाहेत. 
अमोल शिवाजी पाटील (वय 39), श्रीमंत कृष्णा भोंदे (वय 45) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय 45, सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सूर्याजी कृष्णा भोंदे (चालक, वय 39, रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) यांना किरकोळ जखम झाली आहे. हे सर्वजण काही कामानिमित्त दाेन दिवसांपूर्वी काेल्हापूरला कारमधून गेले हाेते. साेमवारी रात्री सर्वजण मुंबईकडे जाण्यासाठी निघाले हाेते. पहाटे सहाच्या सुमारास भरधाव कार साेमाटणे फाटा येथे अाली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण पट्टीला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण हाेती की संरक्षक पट्टी कारच्या अारपार गेली. या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला हाेता. या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकजण किरकाेळ जखमी झाला अाहे. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत. horrific accident near somatne phata, three are seriously injured | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने साेमाटणे पुलाजवळ भीषण अपघात

Post a Comment

 
Top