0

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. साहजिकच शाहिद सध्या जाम आनंदात आहे. मग इतक्या आनंदात सेलिब्रेशन तर बनतेच. काल शाहिदने मीरासाठी खास बेबी शॉवर पार्टी ठेवली. यावेळी मीरा राजपूतच्या चेह-यावरचे तेज सगळ्यांनीच पाहिले.काल दुपारी साज-या झालेल्या या पार्टीची सगळी व्यवस्था शाहिदने स्वत: केली होती. यावेळी शाहिद व मीरा दोघेही केक कापतांना दिसले. यानंतर शाहिदने स्वत:च्या हातांनी मीराला केक भरवला. हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झालेत. या पार्टीत शाहिद व मीराचे अगदी जवळचे मित्र आणि नातेवाईक तेवढेच होते.७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला.  आता मीरा पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती़ म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय. तेही अगदी उत्तमरित्या.
मीशाच्या जन्मानंतर मीरा व शाहिद दोघेही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये दिसले होते़ या शोमध्ये मीशाच्या हजरजबाबी स्वभावाने सगळ्यांचीच मने जिंकली होती़ यानंतर मीरा बॉलिवूड डेब्यू करणार, अशाही बातम्या आल्या होत्या़ पण तूर्तास चित्रपटात काम करण्याचा माझा काहीही विचार नाही. अशा बातम्या कुठून येतात, हे मला कळत नाही,असे तिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल होते. करिअरबद्दल विचारले असता, मला लवकरात लवकर स्वत:ला कामात झोकून द्यायचे आहे. काही तरी क्रिएटीव्ह करण्याची योजना आहे. कामासोबतच मला कुटुंबासाठीही वेळ द्यायचा आहे. आमच्या दुस-या मुलाबद्दलही आम्ही विचार चालवला आहे, असे ती म्हणाली होती़

Post a Comment

 
Top