0
नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगतात 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील या प्रतिष्ठांच्या मांदियाळीत सामील होणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी  बिशन सिंह बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे.रविवारी रात्री आयसीसीने डब्लिन येथील आयोजित कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अंडर-19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या नावाची घोषणा केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि इंग्लडची माजी महिला क्रिकेटपटू क्लेयर टेलर यांच्या सुद्धा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. दरम्यान, या आयोजित कार्यक्रमात राहुल द्रविड अनुपस्थित होता. मात्र, त्याने या सन्मानाबद्दल व्हिडीओच्यामाध्यमातून आयसीसीचे आभार मानले.

राहुल द्रविडने (1996-2012) आपल्या टेस्ट करिअरमध्ये 13,288 धावा केल्या आहेत. तर, 344 वनडे सामन्यांमध्ये नाबाद राहत 71.25 च्या स्ट्राईक रेटने 10889 धावा केल्या आहेत. आश्चर्यजनक बाब म्हणजे राहुल द्रविड वनडे सामन्यांमध्ये 57 वेळा आणि टेस्टमध्ये 52 वेळा बोल्ड झाला होता. 
Rahul Dravid to be inducted into Hall of Fame; fifth Indian player | राहुल द्रविडचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाचवा भारतीय खेळाडू

Post a Comment

 
Top