0
‘स्टार प्लस’वर लवकरच ‘नजर’ ही आणखी एक अमानवी शक्तींवरील मालिका सुरू होणार असून आधुनिक भारतात घडणारी ही मालिका काहीशी फॅण्टसीसदृष्य आहे. आपल्याभोवती चेटकिणींची काळोखी शक्ती लपेटून असते आणि तिचा आपल्या जीवनावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशी या मालिकेच्या कथानकाची संकल्पना आहे. या मालिकेसाठी टीव्हीवरील अनेक प्रसिध्द कलाकारांची निवड करण्यात आली असून अंकुर नय्यर हे अशा नामवंत कलाकारांपैकी एक नाव आहे.
या मालिकेत एका अतिशय महत्त्वाच्या भूमिकेसाठी अंकुरची निवड करण्यात आली आहे. “मला नवनव्या व्यक्तिरेखा उभ्या करायला आवडतात आणि नजरमधील ही व्यक्तिरेखा अशाच आव्हानात्मक भूमिकेपैकी एक आहे. मी आतापर्यंत बऱ्याच  वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असल्या तरी अशा प्रकारची भूमिका मी कधीच रंगविलेली नाही. या मालिकेची  संकल्पनाच अगदी वेगळी असून त्यामुळेच मी त्यात भूमिका रंगविण्यास तयार झालो. या मालिकेत मला अशी आगळीवेगळी भूमिका देऊ केल्याबद्दल मी निर्मात्यांचा आभारी आहे,” असे अंकुरने सांगितले.
नजरमध्ये उर्वशी ढोलकिया चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. उर्वशी ढोलाकियाची स्क्रीन उपस्थिती एक खलनायिका म्हणून अतिशय जबरदस्त आहे. कोमोलिकाची तिची भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडली आणि तिचे त्यासाठी खूप कौतुक झाले. त्यामुळे साहजिकच निर्मात्यांसाठी ती प्रथम पसंती होती आणि तिची निवड यासाठी करण्यात आली. प्रेक्षकांना उर्वशी पुन्हा एकदा एका नवीन खलनायकी भूमिकेत छोट्‌या पडद्यावर दिसून येणार असून हा शो आपल्या स्पेशल इफेक्ट्‌स आणि भयावह पार्श्वसंगीतासह प्रेक्षकांना थक्क करेल.
Ankush Nayyar will seen in 'Nazar' | 'नजर'मध्ये दिसणार अंकुश नय्यर

Post a Comment

 
Top