मॉस्को - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीतील चित्र स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे रशियातील स्पर्धेतही युरोपियन संघांचे वर्चस्व जाणवत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले आठपैकी सहा संघ युरोपातील आहेत. पण युरोपियन मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील दोन संघ सज्ज झाले आहेत. शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार आहे. या थरारात दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि उरूग्वे हे माजी विजेते आपले आव्हान वाचवण्यात यशस्वी होतात का, हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे. अशा असतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती...1930 आणि 1950 मध्ये विश्वचषक उंचावणारा उरूग्वेला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी 1998च्या विजेत्या फ्रान्सचा सामना करावा लागणार आहे. पाचवेळचा विजेत्या ब्राझिलसमोर बेल्जियमचे सोपे आव्हान असणार आहे. अन्य लढतींत 1966नंतर जेतेपदाचा चषक उंचावण्यास उत्सुक असलेला इंग्लंड स्वीडनशी भिडेल, तर यजमान रशिया क्रोएशियाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे.
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
6 जुलै - उरूग्वे वि. फ्रान्स, सायं. 7.30 वा.
ब्राझील वि. बेल्जियम, रात्री 11.30 वा.
7 जुलै - स्वीडन वि. इंग्लंड, सायं. 7.30 वा.
- रशिया वि. क्रोएशिया, रात्री 11.30 वा.
Post a Comment