पुणेः दूध दरवाढीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी राज्य सरकार दोषी आहे, परराज्यातील अमूल-बिमूल दूध महाराष्ट्रात घुसवण्याचे हे धंदे सुरू आहेत, असा आरोप त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
सध्या गुजरातच महाराष्ट्र चालवत असल्याचा टोला हाणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

Post a Comment