0
Bhajji's Gugali, Harbhajan's 'tweet' hits 'Bharat CleanBold' | भज्जीची गुगली, हरभजनच्या 'या' ट्विटमुळे अख्खा 'भारत क्लीनबोल्ड'
मुंबई - टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आणि आक्रमक गोलंदाज हरभजन सिंगने फिफा विश्वचषक स्पर्धेतील रोमांचक सामन्याबद्दल ट्विट केले आहे. फिफा 2018 विश्वचषक स्पर्धा अतिशय उत्तम पार पडल्याचे  हरभजन सिंगने म्हटले. तसेच जवळपास 50 लाख लोकसंख्या असलेला देश क्रोएशिया विश्वचषक अंतिम सामन्यात प्रवेश मिळवतो. पण, 135 कोटी लोकसंख्येचा आपला देश हिंदू-मुसलमान खेळतो, असेही हरभजन सिंगने म्हटले आहे. हरभजनने या एका ट्विटने अख्ख्या भारताला क्लीनबोल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे.
रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेची रविवारी धुमधडाक्यात सांगता झाली. फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामनाही तेवढाच रोमहर्षक झाला. तर इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, अंतिम सामन्यात फ्रान्सकडून 4-2 अशा फरकाने क्रोएशियाचा पराभव झाला. क्रोएशियाच्या या पराभवामुळे फ्रान्सने विश्वचषकावर आपले नाव कोरले. तरीही, जगभरातून मोठा पाठिंबा मिळालेल्या क्रोएशियावर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. क्रोएशियाच्या जिगरबाज खेळीवर कोट्यवधी फुटबॉल चाहते फिदा झाले. त्यामुळेच 'उनकी जीत से जादा हमारे हार के चर्चे है' अशीच भावना क्रोएशियन खेळाडूंच्या मनात असेल.

Post a Comment

 
Top