0
Air hostess wife's suspected death, husband's message | एअर होस्टेस पत्नीचा संशयित मृत्यू, पतीला आला 'हा' मेसेज
नवी दिल्ली - दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये एका एअरहोस्टेसचा संशयित मृत्यू झाला आहे. 7 वर्षांपूर्वीच या एअरहोस्टेसचे लग्न झाले होते. पण, पती-पत्नींमध्ये नेहमीच भांडण होत होते. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत. तर एअरहोस्टेसजने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, मृत्यूपूर्वी विवाहितेने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना मेसेजेस करुन पतीबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. 
लुफ्थांसा एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या 39 वर्षीय अनिसियाने घरगुती भांडणातून हे टोकाचे पाऊल उचलले. पत्नी अनिसिया बत्राने मृत्युपूर्वी आपल्या पतीला एक मेसेज पाठवला होता. त्यामध्ये मी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने म्हटले होते. पत्नी अनिसियाचा मेसेज मिळताच, घरातच असलेल्या पती मयांकने तात्काळ इमारतीच्या छताकडे धाव घेतली. पण, तत्पूर्वीच अनिसियाने छतावरुन उडी मारली होती. त्यानंतर, पतीने लगेचच अनिसियाला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अनिसियाचे वडिल निवृत्त लष्कर अधिकारी असून याप्रकरणी एसडीएम चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अनिसियाच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिसियाला तिच्या पतीकडून सातत्याने मारहाण करण्यात येत होती, असा आरोपही अनिसियाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Post a Comment

 
Top