0
पणजी : राज्यातील भाजपाच्या ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही, अशा आमदारांपैकी काहीजणांना मंत्रिमंडळ फेररचनेची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे या अपेक्षेने काही आमदार प्रयत्नही करू लागले आहेत. गोव्यात गेल्या मार्च 2017 मध्ये भाजपाप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आले. गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष हे या आघाडी सरकारचे घटक आहेत. भाजपाच्या वाट्याला फक्त चार मंत्रिपदे आली आहेत. शिवाय मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आहे. भाजपाच्या चार पैकी दोघे मंत्री गंभीर आजारी आहेत. त्यापैकी एकटे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे गेला महिनाभर मुंबई येथील इस्पितळात उपचार घेत आहे. ते आजारातून लवकर बरे होतील अशी हमी कुणीच दिलेली नसल्याने त्यांना मंत्रिमंडळात किती दिवस ठेवले जाईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्री मडकईकर हे बोलतही नाहीत. त्यांना ब्रेन स्ट्रोक आलेला आहे.
पूर्वीपेक्षा प्रकृती थोडी सुधारल्याचे सांगितले जाते. दुसरे मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही आजारी आहेत. त्यांना अधूनमधून उपचार घेण्यासाठी जावे लागते. मुख्यमंत्री र्पीकर हेही आजारी आहेत पण त्यांची प्रकृती सुधारली आहे. तरीही येत्या महिन्यात विधानसभा अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री र्पीकर हे पुन्हा एकदा आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेला जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपली कामाची वेळ कमी केली आहे. ते सहा तास काम करतात पण महत्त्वाची कामे ते प्रलंबित ठेवत नाहीत.
अर्धे सरकारच आजारी असल्याचा संदेश लोकांमध्ये जात आहे. भाजपाचे काही आमदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून त्यांनी मंत्रीपदे आपल्याला द्यावीत असा प्रयत्न चालविला आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही आपले म्हणणो मुख्यमंत्र्यांसमोर मांडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मंत्रिमंडळ फेररचनेसाठी मुख्यमंत्री पर्रीकर अनुकूल आहेत. मात्र आताच घाई न करता विधानसभा अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर मुख्यमंत्री त्याविषयी निर्णय घेतील असे भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनीही आपण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस त्याविषयी विचार करीन असे बुधवारी पत्रकारांना सांगितले आहे. मंत्रिमंडळातून एक-दोन मंत्री वगळले जातील व नव्यांना संधी दिली जाईल अशी माहिती सुत्रंकडून मिळते. मंत्रिमंडळ फेररचना लवकर झाली तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला ते उपयुक्त ठरेल, असे काही आमदारांना वाटते. निलेश काब्राल, प्रमोद सावंत असे काही आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत पण त्यांनी जाहीरपणो आपले मत मांडलेले नाही. गोवा विधानसभा अधिवेशन 19 जुलैला सुरू होत असून ते  3 ऑगस्टला संपुष्टात येईल.Expectations of Cabinet Ministers in Goa | गोव्यात मंत्रिमंडळ फेररचनेची आमदारांना अपेक्षा

Post a Comment

 
Top