0
टर्किश  आणि इराणी बाथच्या हमामबद्दल भरपूर ऐकले होते. नाटक-सिनेमा आणि प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतही त्याची भरपूर वर्णनं वाचलेली होती. मध्य-पूर्वेतले देश, ग्रीस, इराण, मोरोक्को इथल्या हमामांचे भरपूर फोटो इंटरनेटवर सापडतात. लख्ख चकचकीत संगमरवर, निळ्या-जांभळ्या काचांच्या खिडक्या, निळेशार पाणी वगैरे भरपूर वर्णन इंटरनेटवरही वाचायला मिळतं. घासून-पुसून अंघोळ झाल्यावर, अशा हमामच्या बाहेर गाद्यागिरद्या घातलेली जागा असते, तेथे तुम्हाला आराम करता येतो. आता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे. पण असं असतानाही मुंबईतला एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे. हे कळल्यावर या हमामखान्याला भेट द्यायची उत्सुकता आणखीच वाढली. मुंबईतल्या इमामवाडा या इराणी लोकांच्या वस्तीमध्येच हा हमामखाना आहे. या हमामखान्याबद्दल इंटरनेटवर एखाद-दुसरा लेख वाचायला मिळाला; पण फारशी माहिती नव्हती. स्वत: गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून इमामवाडा गाठला.
My visit to Hamamkhana and community Salons of Mumbai | मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून

Post a Comment

 
Top