0
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाली. मात्र, सध्या संसदेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांकडून या हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. नेपाळमधून हे दहशतवादी दिल्लीकडे रवानाही झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मध्य आणि नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
लखविंदर सिंह और परमिंदर सिंह नेपाळ बॉर्डरमधून एक पांढऱ्या रंगाची इनोवा (UP26 AR 24**) कार घेऊन उत्तर प्रदेशकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचे वय जवळपास 40 वर्षे असून दोघेही एलईडी स्फोटक बनविण्यात तरबेज आहेत. गुप्तचर यंत्रणांशिवाय एका अज्ञात व्यक्तीनेही फोन करुन या दोन दहशतवाद्यांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ही बाब गंभीर घेतली आहे. उत्तराखंडच्या उधम सिंह नगर येथून संबंधित व्यक्तीने फोन केल्याचे नवी दिल्लीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर या नंबरचा तपास करण्यासाठी एक पथक उत्तराखंडला पाठविण्यात आली आहे. दिल्लीत स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या सोहळ्यात हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव आहे. सरकारी वाहन किंवा चोरीच्या गाडीत स्फोटक भरुन हा हल्ला केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. 
दरम्यान, ज्या दोन खलिस्तानी दहशतवाद्यांची नावे समोर आली आहेत, ते खलिस्तान लिबरेशन फोर्स हरमिंदरसिंह मिटू याच्या जवळचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ज्याचा काही महिन्यांपूर्वीच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या हरमिंदरसिंह मिटूला पाकच्या आयएसआयकडून मदत मिळत होती.
Failure of sedition, terrorists access to India via Nepal | ससंदेवर हल्ल्याचे सावट, दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश

Post a Comment

 
Top