0
 FIFA Football World Cup 2018: Great goalkeeping, Croatia won! | FIFA Football World Cup 2018 : 'गोल'रक्षकाची कमाल, क्रोएशियाची धमाल! निझनी नोवगोरोड - विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया यांचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. डेन्मार्कने 120 मिनिटांच्या खेळात 1-1 अशी बरोबरी मिळवून मानसिकरित्या ही लढत जिंकली होती. शूटआऊटमध्ये दोन्ही संघाचा पहिला प्रयत्न गोलरक्षकांना अडवण्यात यश आले. क्रोएशियाने 3-2 (1-1) असा विजय मिळवला. या विजयात गोलरक्षक डॅनिजेल सुबासिच हिरो ठरला.


या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कच्या मॅथीयास जॉर्गेनसेन याने गोल केला. विश्वचषक स्पर्धा इतिहासात हा दुसरा जलद गोल ठरला. डेन्मार्कच्या या गोलला क्रोएशियाकडून चौथ्या मिनिटाला प्रत्युत्तर मिळाले. मारियो मँड्झुकीचने गोल करून क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरानंतर डेन्मार्कच्या खेळाडूने उल्लेखनीय खेळ करताना क्रोएशियाचे जबरदस्त आक्रमण अचूकपणे थोपवले. क्रोएशियाचे 6 ऑनटार्गेट प्रयत्न डेन्मार्कच्या गोलरक्षकाने अपयशी ठरवले. अर्जेंटिनाविरूद्ध चमकलेले क्रोएशियाचे ल्युका मॉड्रीच आणि इव्हान रॅकिटीच यांना जखडून ठेवण्यात डेन्मार्कने यश मिळवले. स्पर्धेत एकाच दिवशी दोन सामने 30 मिनिटांच्या अतिरिक्त खेळले गेल्याची ही पहिलीच वेळ असेल. हे दोन्ही संघ 1998च्या विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीचा अडथळा पार करण्यात यश मिळवले होते. मात्र 115 व्या मिनिटाला मॉड्रीचच्या पासवर रेबिचने डेन्मार्कच्या गोलरक्षकाला चकवून आगेकूच केली. तेव्हा जॉर्गनसेनने रेबिचला पाडले आणि पंचांनी थेट पेनल्टी स्पॉट किकचा इशारा दिला. पण, मॉड्रीचचा तो प्रयत्न डेन्मार्कच्या कॅस्पर श्मायकरने अडवला आणि क्रोएशियाने हातात आलेले उपांत्यपूर्व तिकिट गमावले. 1-1 अशा बरोबरीमुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. 

Post a Comment

 
Top