
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं काही दिवसांपूर्वीच आपल्याला कॅन्सर असल्याची माहिती देऊन आपल्या चहत्यांना धक्का दिला आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. सोनाली आयुष्याच्या खडतर वाटेवरून प्रवास करत असताना अशा कठिण परिस्थितीतही सोनालीसोबत पती गोल्डी बहल खंबीरपणे उभा आहे. याची प्रचिती आपल्याला एका व्हिडीओतून येतेच. सोनालीनं काही दिवसांपूर्वी आपले केस कापतानाचा इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती केस कापल्यामुळे फार इमोशनल झाली असून गोल्डी तिला प्रेमाने शांत करताना दिसत आहेत. पण एक वेळ अशीही होती. ज्यावेळी सोनालीला गोल्डी अजिबात आवडत नव्हता. असे असून देखील आज सोनाली आणि गोल्डी बॉलिवूडच्या सेलिब्रीटी कपल्समध्ये सामिल आहेत. जाणून घेऊयात सोनाली आणि गोल्डीची लव्ह स्टोरी....
सोनाली आणि गोल्डीची पहिली भेट
दोघांची पहिली भेट 1994मध्ये 'नाराज' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी सोनालीची बॉलिवूडमध्ये चलती होती. त्यावेळच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक सोनाली बेंद्रे होती. पहिल्या नजरेतच गोल्डी सोनालीवर फिदा झाला होता. काही काळानं चित्रपटाचं चित्रीकरण संपलं. सोनालीला महेश भट्ट यांच्या दुसऱ्या चित्रपटाची ऑफर मिळाली. फक्त सोनालीसोबत काम करण्याची संधी मिळावी आणि तिला पाहता यावं म्हणून गोल्डीनं महेश भट्ट यांच्यासोबत त्याच चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
सोनालीला गोल्डी अजिबात आवडत नव्हता
गोल्डीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, 'आधी सोनालीला मी अजिबात आवडत नव्हतो. कारण ज्यावेळी आमच्या दोघांची नजरा नजर व्हायची त्यावेळी सोनाली पटकन माझ्याकडे दुर्लक्ष करत असे. त्यानंतर एका पार्टीमध्ये माझ्या बहिणीने आमच्या दोघांची ओळख करून दिली होती. त्यावेळी मी दुसऱ्यांदा सोनालीच्या प्रेमात पडलो होतो. कारण सोनाली फार सावकाश जेवते आणि मला तिची हीच सवय फार आवडली होती. त्याचवेळी आमच्यामध्ये मैत्री झाली.'
2002मध्ये सोनालीनं गोल्डीचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला
1998मध्ये सोनालीला गोल्डीनं आपल्या मनातली गोष्ट सांगितली आणि तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यावेळी दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती, त्यामुळे सोनालीनेही गोल्डीच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच 2002मध्ये या दोघांनी लग्न केलं. सोनाली आणि गोल्डी यांना 13 वर्षाचा एक मुलगा असून त्याचं नाव रणवीर आहे.
Post a Comment