0
Nashik : message from cycle wari for environmental protection | नाशिकच्या सायकल वारीत प्रदूषण मुक्तीचा संदेश, 500 सायकलस्वारांचा समावेशकरकंब - आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून प्रदूषणमुक्ती, प्लास्टिक बंदी, पर्यावरण पूरक संदेश व निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन निघालेले 500 सायकल स्वार उच्चशिक्षित विविध क्षेत्रातील वारकऱ्यांची दिंडी आगळा वेगळा संदेश देत आज शेवटचा मुक्काम संपवून टेंभुर्णी - पंढरपूर मार्गावरून जाताना करकंब येथे विसावा घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकरी विविध पालखी सोहळे व दिंड्याच्या माध्यमातून पायी चालत पंढरपूरला येतात परंतु नाशिक येथील नाशिक सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने मागील सात वर्षापासून आगळा वेगळा उपक्रम राबवत कोणत्याही प्लास्टिकचा न वापर करता, रस्त्यांमध्ये विविध ठिकाणी एक हजार वृक्षारोपण करून व इंधन बचत करीत नाशिक ते पंढरपूर सायकलवरून चार दिवसात 360 की मी चे अंतर पार करीत पंढरपूरला येतात.
यामध्ये उद्योगपती, व्यावसायिक,नोकरवर्ग आहेत शिवाय यात 100 महिलांचा समावेश असून लहान मुले व 70 वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिक यांचाही सहभागी आहे.

सोलार रथामध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेऊन हा रथ सायकलवारीत इंधन बचतीचा संदेश देत होता. दिव्यांग व्यक्तीही या वारीत सहभागी होऊन दोन पँडलच्या सायकलवरून आपली पंढरीची वारी करीत आहे. तसेच सर्व सायकल स्वरांची जेवणाची व्यवस्था ही स्वतः सायकल स्वरांनी केली होती.

पर्यावरणामध्ये वाढते प्रदूषण व इंधन बचत व निरोगी आरोग्यासाठी उत्तम व्यायाम याची सांगड घालून विठुरायाच्या नामस्मरणात आज आम्ही सायकल वारी ही संकल्पना घेऊन मागील सात वर्षा पासून या निमित्ताने आषाढी वारी करीत आहे. - हरिष बैजल, सायकल वारीचे संकल्पक

Post a Comment

 
Top