0
नागपूर : राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजाच्या राखीव असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. 
 आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून नव्या नोक-यांमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सध्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे  उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर हा बॅकलॉग भरला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

16 percent reservation for the Maratha community in the jobless - Chief Minister | नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री 

Post a Comment

 
Top