0
VIDEO: CCTV footage of the plane crash occurred at Ghatkopar |   VIDEO : घाटकोपर येथील विमान अपघाताचे CCTV फुटेज आले समोर  
मुंबई - घाटकोपर येथे गुरुवारी झालेल्या चार्टर्ड विमानाच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या चित्रफितीमध्ये अपघातग्रस्त झालेले चार्टर्ड विमान भरधाव वेगामध्ये येत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला धडकल्याचे दिसत आहे. 
घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ झालेल्या या अपघातात एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता.  विमानाच्या पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांच्यासोबत पादचारी गोविंद पंडित यांचा  या अपघातात मृत्यू झाला होता.
दरम्यान, विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की, विमानाचे मालकी हक्क जरी आमच्याकडे असेल तरीही इन्डॅमर कंपनीच्या अंतर्गत विमानाची देखरेख होत होती. विमान आमच्याकडे पूर्णतः सोपवण्यात आलेले नव्हते. शिवाय,  उड्डाण योग्यतेचे प्रमाणपत्र म्हणजे एअरवर्दीनेस विभागाकडून उड्डाणाची परवानगीदेखील मिळालेली नव्हती.

Post a Comment

 
Top