0
उपवास करण्याचे जसे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तसे त्याचे काही नुकसानही आहेत. मात्र हे नुकसान काही लोकांनाच होऊ शकतात. काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना डॉक्टर उपवास करण्यास मनाई करतात. कारण असे केल्यास त्यांचं आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं. अशाच काही लोकांबद्दल आपण माहिती घेऊया ज्यांनी उपवास अजिबात करू नये.
* डायबिटीजच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचे असते. अशात त्यांनी जर उपवास करून शरिराला यातना दिल्यात तर त्याना त्याचा मोठा फटका बसू शकतो.
* हाय बिपीच्या पेशन्टनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
* नुकतीच ज्या पेशन्टची सर्जरी झाली आहे त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची गरज असते.
* ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.
* हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरीराचं सिस्टम बिघडू शकतं.
* ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.
* प्रेग्नेंट महिलांना सतत व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर या दरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने महिला आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
* ब्रेस्ट फिडींग करणा-या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटामिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
Health Tips : People who should avoid fast | 'या' प्रकारच्या लोकांनी चुकूनही करू नये उपवास, आरोग्यासाठी ठरेल घातक !

Post a Comment

 
Top