
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
भारतीय लष्कराने आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारतीय जवानांनी म्यानमारमधील NSCN-K दहशतवाद्यांचा कॅम्प नष्ट केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलल्या सर्जिकल स्ट्राईकच्या व्हिडिओवरून देशात आरोप प्रत्यारोप सुरु असताना जवानांनी नागालँड सीमेजवळ म्यानमारमध्ये शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. या कारवाईत 4 दहशतवादी ठार तर काही जण जखमी झाल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Post a Comment