अभिनेत्री मीरा जोशी सध्या 'झी मराठी' वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेत ग्रे शेड असलेली मेनका व्यक्तिरेखा साकारत आहे. समीर-मीरा यांच्या लव्हस्टोरीत ती महत्त्वाची भूमिका साकारतेय. समीर आणि मीरा यांच्या आयुष्यात येऊन मेनकाने त्यांच्यात दुरावा निर्माण करण्यात यशस्वी ठरली इतकंच नव्हे तर तिने समीरशी साखरपुडा करण्याचा हेतू देखील साध्य केला. समीर आणि मीराला एकमेकांपासून दूर करण्यासाठी मीरा कुठल्या थराला जाईल हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत. तिच्या या व्यक्तिरेखेविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मीरा जोशी हिच्याशी साधलेला हा संवाद.
* डान्सिंग, मॉडेलिंगपासून तू करिअरला सुरूवात केलीस. अनेक हिंदी, मराठी मालिका, चित्रपट यानंतर आता झी मराठी वारिक 'तुझं माझं ब्रेकअप' ही लोकप्रिय मालिका कसं वाटतंय?
- खूप छान वाटतंय. अभिनय करणं हे कधीही माझं पहिलं प्रेम नव्हतं. मला डान्सिंगमध्येच करिअर करायचं होतं. मी कथ्थक, भरतनाट्यम शिकले होते. मुंबईला येऊन मी आॅडीशन्स आणि स्पर्धांमध्येही भाग घेतला. एक डान्स रिअॅलिटी शो करत असताना माझ्या पाठीला दुखापत झाली. मला डॉक्टरांनी सांगितलं की, तू आता डान्स करू शकणार नाहीस. मग मला एक मालिकेची आॅफर आली. मी हीच आयुष्याने दिलेली संधी समजून स्विकारली. आणि मग माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये मेनकाची भूमिका करताना मला मजाच येत आहे. कुठलाही गॉडफादर नसताना हा सगळा प्रवास करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.

Post a Comment