0
Two people were killed and three others injured in a car and a container accident | कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी
मुंबई - मुलुंड-ऐरोली पुलाच्या दिशेने जाणा-या होंडा सिटी कारचा कंटेनरला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर तिघे जण जखमी झाले आहेत. मुंबईहून ठाणाच्या दिशेने जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक पार करून ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणा-या कंटेनरवर धडकली. या अपघाताची नवघर  पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भांडुप ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या उड्डाणपुलावर एका भरधाव कारने एका कंटेनरला धडक दिली. या अपघातात दुर्दैवानं दोघांचा मृत्यू झालाय, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. इतर जखमींना जवळच्याच फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. पहाटे साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली . हेमंत शिव गुंडे, निहार कोडे, अक्षय मोरे हे तिघे जण जखमी झाले आहेत, तर महेश आणि चिकू या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, हे सर्व 20 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. 

Post a Comment

 
Top