0
Where is Kapil Sharma now? | सध्या कुठे आहे, काय करतोयं कपिल शर्मा?
कॉमेडी किंग कपिल शर्मा अलीकडे उगवला होता. पण नंतर पुन्हा गायब झाला. काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवरही तो दिसला.  त्याचे वाढलेले वजन पाहून अनेकांनी त्याला यावेळी ओळखले नाही. त्यानंतर कपिल पुन्हा दिसलाच नाही. टीव्हीपासून दूर असलेला कपिल सध्या कुठे आहे, काय करतोय,असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणे त्यामुळेच साहजिक आहे. पण आता कपिलचा पत्ता लागलाय. होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा सध्या ग्रीसमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल सध्या आपल्या आरोग्याची काळजी घेतो आहे. ताणविरहित जगतांनाच पौष्टिक अन्न घेण्यावर त्याचा भर आहे. कपिलची गर्लफ्रेन्ड गिन्नी सुद्धा ग्रीसमध्ये त्याला ज्वॉईन करणार आहे.
सध्या कपिलचे वजन बरेच वाढले आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर चाहत्यांची चॅट करताना, स्वत: कपिलनेही वजन वाढल्याचे कबुल केले होते. माझे वजन वाढले आहे. योग्य शेपमध्ये आल्यानंतर मी माझा प्रोफाईल पिक्चर बदलेल, असे त्याने सांगितले होते. सध्या मी माझी लाईफ स्टाईल बदलण्याचा प्रयत्न करतोय, असेही तो म्हणाला होता. खरे तर कपिलचे चाहते त्याची आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. कपिलने लवकरात लवकर परत यावे, अशी त्यांची इच्छा आहे. आता फक्त ही गोष्ट कपिल कधी मनावर घेतो, ते बघूयात.
गेल्या वर्षभरापासून कपिलची गाडी रूळावरून घसरलीयं. त्यापूर्वी कपिल सूसाट पळत होता. पण मध्यंतरी त्याचे सुनील ग्रोव्हरसोबत भांडण झाले. मग तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे ऐकवात आले. नंतर त्याने सेलिब्रिटींना टाळणे सुरु केले आणि यातच आपला शो बंद पाडला. यापश्चात एक चित्रपट आणि नवा शो घेऊन तो परतलाही. पण त्याचा चित्रपट आणि नवा शो दोन्हीही फ्लॉप ठरलेत. 

Post a Comment

 
Top