0
People in Vidarbha will have the highest impact on temperature rise - World Bank | विदर्भाला सर्वात जास्त चटके, तापमानवाढीमुळे भारताचा जीडीपी घसरणार
नवी दिल्ली- हवामान बदल आणि तापमान वाढीचा धोका संपूर्ण पृथ्वीला असल्याचं आता जाणवत आहे. तापमानवृद्धीमुळे पयार्वरणाचा होत चाललेला नाश यामुळेही माणसाच्या समोर अऩेक संकटे उभी राहिली आहेत. जागतिक बँकेने तापमानवृद्धीचा भारताला मोठा फटका बसेल असे एका अभ्यासातून स्पष्ट केले आहे. 60 कोटी भारतीयांचे आयुष्य तापमानवाढीमुळे प्रभावित होणार आहे.

2050 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल आणि भारताच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे राहणीमान हवामान बदलामुळे घसरेल. मध्य भारतातील जिल्हे विशेषतः विदर्भात तापमानात मोठी वृद्धी झाल्यामुळे तेथे अर्थकारण 10 टक्क्यांनी मंदावेल असे जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भ आणि तेलंगण तसेच मध्य भारतातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमान अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने व्यक्त केलेली भीती काळजी करायला लावणारी आहे.
दक्षिण आशियातील हॉटस्पॉटस या अभ्यासामध्ये 2015 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल त्यामुळे भारताला 1.1 ट्रीलियन डॉलर्सचा फटका सहन करावा लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमान वाढीचा फटका किनारी प्रदेश आणि पर्वतमय प्रदेशापेक्षा मध्य भारताला आणि उत्तर भारताला जास्त बसेल असेही या अभ्यासामध्ये आढळले आहे. छत्तिसगड, मध्यप्रदेशातील लोकांच्या राहणीमानात 9 टक्क्यांनी घसरण होईल तसेच विदर्भातील शेतीला सर्वात जास्त फटका बसणार आहे. भारतातील 10 हॉटस्पॉटमध्ये 7 जिल्हे विदर्भातील आहेत.

Post a Comment

 
Top