0
go to homes of congress and jds rebels get them to bjp says bs yeddyurappa | काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भाजपात घेऊन या, येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आवाहन
बंगळुरू- भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. कर्नाटकातल्या भाजपा नेतृत्वानं शुक्रवारी कार्यकर्त्यांना जेडीएस आणि काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपामध्ये घेऊन या, असं आवाहन केलं आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाची पहिलीच बैठक झाली, त्या बैठकीत कार्यकर्त्यांना काँग्रेस-जेडीएसमधील नाराज बंडखोरांना भाजपामध्ये आणण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस आणि जेडीएस पाच वर्षं सरकार पूर्ण करण्याआधीच भाजपाचं सरकार कर्नाटकमध्ये येईल, असा विश्वासही येडियुरप्पांनी व्यक्त केला आहे.

येडियुरप्पा म्हणाले, जनतेचा कौल स्पष्ट आहे. ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसवू इच्छितात. त्यांनी त्यांचं समर्थनही भाजपाला दिलं आहे. 2019मध्ये भाजपाला केंद्रात पुन्हा सत्तेवर आणण्यासह मजबूत बनवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या नाराज बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना भाजपात घेऊन या. आम्ही कर्नाटक आणि देशाचा विकास करू इच्छिणा-या प्रत्येकाचं स्वागत करत आहोत. आम्ही आततायीपणे कोणतंही पाऊल उचलणार नाही. जेडीएस आणि काँग्रेसची अपवित्र आघाडी लवकरच तुटणार असून, ते सत्तेतील पाच वर्षं पूर्ण करणार नाहीत. आम्ही अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहू, त्यानंतरच पुढची दिशा ठरवणार असल्याचे सूतोवाच येडियुरप्पांनी केले आहेत.

Post a Comment

 
Top