0



नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
येत्या काही काळात इराणहून होणार्‍या तेलाच्या आयातीमध्ये भारताकडून कपात केली जाऊ शकते,  अशी माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली. आयात कमी करावी, यासाठी अमेरिकेने दबाव वाढविल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. इराणऐवजी सौदी अरेबिया आणि कुवेतहून कच्च्या तेलाची आयात वाढविण्याचा विचारही केंद्र सरकार करीत आहे. इतर देशांच्या तुलनेत इराणचे तेल भारताला स्वस्त पडते. त्यामुळे इराणच्या तेलाची आयात कमी झाली, तर त्याचा फटका भारतालाच बसणार आहे.

Post a Comment

 
Top