0
hadapsar Crime News | पत्नी, मुलगी, सास-यासह पाच जणांवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न
पुणे - हडपसर  येथील काळेबोराटे नगर येथे एकाने किरकोळ कारणावरून  पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा अशा पाच जणांवर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर त्याने स्वत:च्याही गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमींवर रुग्णालयात  उपचार सुरु आहेत, तर त्याची प्रकृती गंभीर असून ससूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद शहाजी कसबे (वय ३५, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. नंदिनी मिलिंद कांबळे (वय २२), मुलगी गौरी मिलिंद (वय ४), सासरा दिलीप देवराम कांबळे (वय ४२) चुलत सासरे मनोहर देवराम कांबळे (वय ५२), मेव्हणा सागर मनोहर कांबळे ( वय २०)हे जखमी झाले आहेत. 
मिलिंद  मुळचा उस्मानाबादचा असून पत्नी  व मुलीसह फुरसुंगी येथे राहण्यास आहे. तो पुण्यात रंगकाम करतो. पत्नीचे  कुटुंबीय काळेबोराटे नगर परिसरात राहण्यास आहेत. मागील दोन दिवसांपासून पत्नी आई वडीलांच्या घरी राहण्यास गेली होती. त्याच दरम्यान मिलिंदचे आई वडीलही उस्मानाबादहून पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी व त्याला उस्मानाबादला परत येण्यास सांगितले. त्यानुसार तो तिला घेऊन जाण्यासाठी सासरच्या मंडळींकडे गेला. सास-याने त्याला गावाकडे खूप पाऊस   सुरु आहे. तेथील घराची स्थिती वाईट आहे. दोन दिवसांनी घेऊन जा असे सांगितले. याच कारणावरून तो गुरुवारी सायंकाळी काळेबोराटे नगर येथे सासºयाच्या घरी तीक्ष्ण हत्यार घेऊन गेला. या हत्याराने त्याने पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा अशा चौघांवर या हत्याराने वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार केले. या प्रकाराने घरात गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मिलिंदची प्रकृती गंभीर आहे. इतर सर्वांवर उपचार सुरु आहेत.

Post a Comment

 
Top