0
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सर्वात मोठा मुलगा आकाश अंबानी हा लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढतोय. श्लोका मेहता हिच्यासोबत तो लग्नगाठ बांधतोय. खरे तर मार्च महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्याघरी या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. मार्चमध्येच आकाश व श्लोका यांनी आपले नाते जगजाहिर केले होते. गोव्यात या दोघांची प्री-एंगेजमेंट झाली होती. येत्या ३० तारखेला आकाश व श्लोका यांची ग्रँड ‘एंगेजमेंट सेरेमनी’ होत आहे. त्यानिमित्त आज अंबानींच्या घरी एक ग्रँड पार्टी ठेवली गेली. या पार्टीत बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात आलिया भट्ट, रणबीर कपूर, शाहरूख खान, करण जोहर, अयान मुखर्जी, सचिन तेंडुलकर आदींचा समावेश होता. या सेलिब्रिटींचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आलिया भट्ट पिंक कलरच्या साडीत या पार्टीला पोहोचली. पिंक कलरच्या या साडीत आलिया कमालीची सुंदर दिसत होती.
आकाशचा लहान भाऊ अनंत बेबी पिंक कलरच्या नेहरू कुर्त्यात दिसला.
‘संजू’ या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणारा रणबीर कपूरही आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या पार्टीला पोहोचला.
दिग्दर्शक व निर्माता करण जोहर गर्द लाल रंगाच्या कोटमध्ये या पार्टीत सामील झाला.
दिग्दर्शक निर्माता विधू विनोद चोप्राही यावेळी दिसले.
सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत दिसला. दोघांनीही या सोहळ्यासाठी
पारंपरिक पोशाखाची निवड केली.

Post a Comment

 
Top